राजकीय
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दि.१७ रोजी फलटण येथे” माढा विजय निर्धार मेळाव्याचे” आयोजन
(जावली/अजिंक्य आढाव) – लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आमदार महादेवराव जानकर साहेब यांनी उमेदवारी साठी शडडु ठोकला असून दि. १७ रोजी या पार्श्वभूमीवर फलटण येथे अनंत मंगल कार्यालय येथे “माढा विजय निर्धार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे , असे रासप चे प्रदेश अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले आहे.
भव्य राॅलीचे आयोजन
शनिवारी फलटण येथे माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेऊन महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली चार चाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे .शिखर शिंगणापूर – कोथळे – जावली – सोनवडी बुद्रुक, सोनवडी कोळकी मार्गा मेळाव्याच्या ठिकाणी पोचणार आहे.