गोखळी (प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती (गोखळी) येथील एकदंताय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन युवानेते शंभूराज खलाटे यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती (गोखळी) येथील एकदंताय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रमाणे गणेश जयंतीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर, लष्करात काम करणाऱ्या सेवानिवृत्त जवानांचा सन्मानित. शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा , खेळाडूंचा गौरव , वृक्षारोपण करून जोपासना करणे आदी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहेत असे शंभूराज खलाटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले.
सस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खटकेवस्ती गावचे विकासरत्न सरपंच श्री बापूराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अक्षय ब्लड बँक पुणे यांनी सहकार्य केले.
सैन्य दलात यशस्वी सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त जवान श्री सचिन धायगुडे मेजर बी.एस.एफ व श्री सुरेश मुळीक मेजर आर्मी. NMMS आर्थिक गटात पात्र झालेल्या बद्दल हनुमान माध्यमिक विद्यालयातील कु.भक्ती दिनेश मचाले. आणि बुध्दिबळ परिक्षेत जिल्हा स्तरावरील निवड झाल्याबद्दल खटकेवस्ती प्राथमिक शाळेतील विशाल वळकुंदे कार्तिक शिंदे. करण वळकुंदे श्रेया वलकुंदे.भावनाराज गायकवाड.या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फाउंडेशन च्या वतीने सरपंच श्री बापूराव गावडे यांनी संस्थेला ५००००/- (पन्नास हजार) रुपये देणगी जाहीर केली
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री गणेश पुजन व आरती पाहुण्यांचे हस्ते करण्यात आली.एकदंताय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर चव्हाण. उपाध्यक्ष आकाश घाडगे खजिनदार विकास गायकवाड. व पदाधिकारी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करुन संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाची तालुका अध्यक्ष बजरंग गावडे. युवा नेते गवळीबुवा विकास सोसायटीचे चेअरमन अक्षयकुमार गावडे , श्रीराम कारखाना पतसंस्थेचे चेअरमन संतोष खटके.* *ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत. अमित खटके. सत्यजित खटके. खटकेवस्ती चे पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ, गोखळीचे पोलिस पाटील विकास शिंदे , सुखदेव खटके माजी सैनिक पोपट* *भोसले.राजेंद्र गावडे पाटील.निलेश बागाव.उपस्थित होते. यावेळी बजरंग गावडे, संतोष राऊत, कु.धनश्री गावडे अक्षय खटके यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास खटकेवस्ती आणि पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी केले व संस्थेचे सचिव सुनील चव्हाण यांनी आभार मानले.