आपला जिल्हा
मराठा आरक्षण प्रकरणी माण तालुक्यात १० ठिकाणी बंद यशस्वी, उद्या गुरुवारी म्हसवड बंदची हाक..!
(म्हसवड/ प्रतिनिधी) – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासह सगेसोयरांचा कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज राज्यात बंद पुकारण्यात आला होता त्यास माण तालुक्यातील मोजक्या गावात संमिश्र प्प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.शाळा, काॅलेज, दवाखाने, हाॅस्पिटल, मेडिकल, शासकीय कार्यालये व अत्यावश्क सेवा वगळून अनेक ठिकाणी बंद यशस्वी झाला दहिवडी पोलिस स्टेशन हद्दीत गोंदवले बु गोंदवले खु, बिजवडी, बिदाल, राणंद, मोहि येथे तर म्हसवड पोलिस स्टेशन हद्दीत भाटकी, हवलदारवाडी, कुकूडवाड, शेनवडी या ठिकाणी बंद पाळण्यात आला तर उदा गुरुवारी म्हसवड बंद ठेवण्यात येणार आहे.या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिक-ठिकाणी माण तालुक्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
मराठा आरक्षण प्रकरणी बुधवारी बंद पाळण्यात आला होता मात्र बुधवार हा म्हसवड व परिसरातील नागरिक व्यापारी व्यावसायिक यांचा आठवडा बाजार असल्याने बंद बुधवारी न पाळता गुरुवार दिनांक १५/२/२०२४ बंद पाळण्यात येणार असल्याचे मराठा समाजाने म्हसवड पोलिस ठाण्यात निवेदन दिले.