हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

एक वर्षापूर्वी ६५ वर्षाची अतिक्रमण काढून सिंघम, झालेले प्रशासक डॉ सचिन माने चिंगम का झाले…?

(म्हसवड/ प्रतिनिधी)-  एक वर्षापूर्वी सातारा पंढरपूर रोड नजिक सिध्दनाथ हायस्कूल ते बसस्थान दरम्यान १००० ते ९०० शे फुटा मधील ६५ वर्षापासून म्हसवड पालिकेच्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढण्यावर या जागेवरील दुकानदार व पालिका यांचेतील वाद गेले अनेक वर्षापासून कोर्टात सुरू होता याचा निकाल हि पालिकेच्या बाजून लागला होता मात्र या जागेवरील दुकानदार यांनी कोर्टात अपिल केले होते तर पालिकेने १० वर्षापूर्वी हि अतिक्रमणे काढण्यासाठी लाखो रुपये पोलिस बंदोबस्त व महसूल खर्च करुन हि राजकीय हस्तक्षेपामुळे वारंवार अतिक्रमण काढण्यास ब्रेक लागत होता पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होताच प्रशासन अधिकारी डॉ सचिन माने सिंघम होऊन प्रशासनाला, पोलिस यंत्रणा व महसूल यांना बरोबर घेत आज वर्षापूर्वी अतिक्रमणे काढली मात्र आज वर्षे झाले तरी हि या मोक्याच्या जागे व्यापारी संकुल, मॅल उभा करून म्हणणारे व अतिक्रमणधारकांचे सिंघम बनलेले प्रशासक डॉ माने म्हसवडच्या विकास कामात पूर्ण अपयशी ठरुन चिंगम झाल्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे.

सिध्दनाथ यात्रेच्या अनुशंगाने बस स्थानक महिन्या नंतर सातारा पंढरपूर रोड लगत बस स्थानक ते सिध्दनाथ हायस्कूल परिसरातील, यात्रा पटांगण व श्री सिध्दनाथ जोगेश्वरी मंदिराच्या परिसरातील जवळ पास साठ ते सत्तर रस्त्यावरील व पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण झालेली दुकाने म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात आली सिध्दनाथ हायस्कूल ते बस स्थानका पर्यंत असलेली एक हजार फूट जागेवर अतिक्रमण केल्याचा दावा पालिका करत होती पालिका व या परिसरातील दुकानदार यांचे मधील जागेचा वाद कोर्टात सुरू होता नक्की या जागेवर मालकी पालिकेची कि शासनाची अनेक वर्षे वाद न्यायालयात सुरू होता अनेक वर्षे तारीख पे तारीख सुरु होती दोन निकाल हि सात वषांपूर्वी लागले होते त्यावेळी हि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया झाली होती मात्र त्यानंतर कोर्टात अपिल करुन कारवाईस स्थगिती मिळवली होती त्यानंतर दोन दिवसांत प्रशासक सचिन माने यांनी ४८ तासात अतिक्रमण काढण्याच्या नोटीस दिल्या व दुसऱ्या दिवशी होत्या त्यानंतर ७० ते ८० पोलिस कर्मचारी, तहसीलदार वट्टे, भुमिअभिलेखाचे शिंगाडे,तलाठी उत्तम आखडमल, व पालिकेच्या कर्मचारी यांनी हि अतिक्रमण कारवाई करुन प्रशासक डॉ सचिन माने कधी सिंघम तर कधी मुंबई अतिक्रमणधारकांचा कर्दनकाळ ठरलेले गो.रा खैरनार , तुकाराम मुंढे म्हणून या ६५ वर्षीची अतिक्रमणे भल्लभल्या मुख्याधिकारी यांना काढण्यास जमले नाही ते अतिक्रमणे डॉ सचिन माने यांनी काढून म्हसवडकरांनी अनेक उपाध्या दिल्या होत्या मात्र आज १३ फेब्रुवारी २०२२ रोजी या घटनेला एक वर्षे झाले तरी या जागेवरील अतिक्रमणे काढल्यावर जे दगड विटा माती यांचे ढिग होते तसेच ढिग जैसे थे या जागेवर दिसत आहेत एका वर्षात या जागेवर व्यापारी संकुल, मॅल बांधण्याचा म्हसवडकरांना दिलेला शब्द अतिक्रमणधारकांचा कर्दनकाळ ठरलेले व विकासाची दाखवलेली स्वप्ने हि म्हसवडकराची स्वप्नच राहिली म्हसवड पालिके मध्ये प्रशासकीय राजवट लागू होऊन जवळ जवळ अडीच वर्षे झाली या अडीच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत म्हसवड शहर व परिसराचा नकशाच बदलेल असे म्हसवडकरांना वाटले होते मात्र , बस स्थानक ते स्मशानभूमी रस्ता सोडला तर अडीच वर्षात एक हि काम झाले नाही, आ जयकुमार गोरे यांनी कोट्यावधी ची कामे आणली ते हि त्यांना सुरू करता आली नाहीत ज्या पाणी योजनेचे काम ग्रामीण भागात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे त्या कामा ऐवजी इस्लापुर टॅक ते कारखेल फिल्टर टॅक पर्यंतची मेन पाईप टाकली आसती तर आज जे १० ते १२ दिवसानी म्हसवडकर व ग्रामीण भाग पाणी पित आहे ते दर रोज पाणी पिले आसते मात्र प्रशासक डॉ सचिन माने यांना नक्की म्हसवडकरांना त्रास का द्यायचा आहे म्हसवडच्या राजकारणात त्यांना एवढा ईन्ट्रेस का आहे त्यांना पालिका निवडणुकीत तर उभे राहण्याची इच्छा नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!