(म्हसवड /प्रतिनिधी) – पिढ्यान पिढ्या पाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माण खटावच्या भुमित उरमोडीचे पाणी माण तालुक्यातील शेवटच्या टोकाला खळखळवून माणच्या शिवारात ऊस पिकवण्याची आशा पंधरा वर्षापूर्वी इथल्या जनतेला दाखवली होती ते येत्या १९ तारखेला मी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे माण तालुक्यात अनेक आले व गेले , अनेक आमदार झाले केवळ राजकारण करणारे संपले त्यांची आज नावे हि घेतली जात नाहीत यापूर्वीच्या आमदारांची काय अवस्था आहे हे तुम्ही बघत आहात पंधरा वर्षात पदोपदी मला विरोध करणाऱ्या प्रस्थापितांच्या डोळ्यात माझे काम खुपत असल्याने त्यांच्या पोटात गोळे उठतात त्यांना आजून हे रसायने समजले नाही आणी कदापि समजणार नाही महाराष्ट्रात कोठे हि १४ किलोमीटरहून अधिक बोगदा पाण्याचा नाही तो करुन दाखवला व माण खटावच्या मातीत गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी या युग परुषाच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार आहे तरी या ऐतिहासिक जल पुजनाचे साक्षीदार कोणासाठी म्हसवड सह म्हसवड परिसरातील नागरिक, महिला, तरुण युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे व्यक्त केले.
जिहे कटापूर उपसा जल सिंचन योजनेच्या कामाचे उदघाटनव जल पुजन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी माण तालुक्यात आंधळी येथे येत आहेत त्यानिमित्ताने आ जयकुमार गोरे यांनी माण खटाव मध्ये गाव भेटीचा कार्यक्रम प्रत्येक गावात सुरू केला आहे काल शनिवारी म्हसवड, हिंगणी, धुळदेव,देवापुर शिरताव,विरकरवाडी,पुळकोटी, आदी गावातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक माजी नगराध्यक्ष विजय नट यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती या बैठकीस अर्जुन काळे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,सामाजिक कार्यकर्ते सुनील पोरे, सुरेश म्हेत्रे,माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गोरे, अकिल काझी, काकासाहेब माने आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, सुमारे पाचशे वर्षाने इतिहास बदलला गेला प्रभू रामचंद्र मंदिराचा वनवास २२ जानेवारीला संपला आणि त्याच दिवशी माण मध्ये ऐतिहासिक नोंद झाली ती म्हणजे जिहे कटापूर उपसा जल सिंचन योजनेचे आंधळी धरणात पाणी सोडण्यात मोठे यश आले. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी जलपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते ती स्वप्नपुर्ती झाली आहे. जिहे कटापूर योजना पूर्ण होत असताना मला अनेक अडचणीवर मात करावी लागली. पण ही योजना पूर्ण झाल्याचा अन पाणी आणल्याचा मला मोठा आनंद होत आहे. जिहे कटापूर योजना मागीं लागण्याचा हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा ऐतिहासिक योगायोग आहे. माणदेशी जनता व माझ्या आमदारकीच्या कालखंडातील हा महत्वपूर्ण क्षण आहे. खटाव तालुक्यातील नेर तलावापासून आंधळी धरणात पाणी सोडण्याच्या १४ किलोमीटर बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करून पाणी सोडले आहे. दुष्काळी माण तालुक्याला सव्वातीन टीएमसी पाणी माण खटावचा दुष्काळ निश्चितपणे हाटेल, नेर तलावातून आंधळी धरण, माणगंगा नदीमधून म्हसवड पर्यंतचे सिमेंट साखळी बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून माणगंगा नदी प्रवाहित होऊन माण तालुक्यातील शेवटचे टोक असलेला हिंगणी येथील शेतकरी यांच्या बांधावर पाणी जाणार आहे मी ज्यावेळी आमदार झालो, दुष्काळी भागातील जनतेला पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते त्या स्वप्न पुर्तीसाठी चौदा वर्षापासून झपाटून काम करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाच्या जोरावर योजना पूर्ण करण्यात मोलाची मदत झाली.
प्रास्तापितांच्या विरोधाला व कुरघोड्यांना माती मोल करत माण खटावच्या मातीत पाणी आणले मी मंत्री झालो असतो तर पाण्याला मला मुकावे लागले आसते त्यामुळे
मंत्री पदा पेक्षा किती तरी पटीने महत्त्वाचा पाणी प्रश्न सुटतात विकास कामे होत आहेत परवा विजयी निश्चिय मेळावा घेतला त्याला तुम्ही येथे जमला तेवढेच होते काय बोलत्याती त्यांचे त्यांना तर कळत होते का हा जयकुमार तलाठी निर्माण करणारे मशिन आहे आणि असे किती तर जिल्हाधिकारी माझ्या मागे पुढे करतात माझ्या विरोधात बोलणारांची आंडी पिली जयकुमारला माहिती आहेत त्यामुळे जयकुमारच्या नादाला लागू नका असे म्हणून आ गोरे यांनी उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांना दोन दिवसात या कार्यक्रमाच्या पत्रिका मिळतील त्या माण तालुक्यातील प्रत्येक घरात विरोधक असला तरी त्याच्या घरात पत्रिका गेली पाहिजे एक ही घर पत्रिके वाचून राहणार नाही, विरोधकांनी हि पाण्याचे राजकारण करु नये व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित रहा
महिलांनी प्रत्येक घरात घरात जावून हळदी कुंकू लावा व या उदघाटनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देवून येण्यासाठी आग्रह धरा जयाभाऊचा निरोप आहे असे सांगा नक्की महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील म्हसवड उरमोडी लाभ क्षेत्रात मोडत नाही तरी हि सर्वाचा विरोध मोडून म्हसवडला पाणी देणार आहे त्यामुळे म्हसवड मधील जनतेने ताकतीने हा कार्यक्रम करायचा आहे या कार्यक्रमास एक लाख लोक जमवून ऐतिहासिक सभा होण्यासाठी कामाला लागा ताकतीने येवून सर्वानी मोदीजी स्वागत करायचे आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धट यांनी तर आभार सुनील पोरे यांनी मानले विजय सिन्हा, नितीन दोशी, आदीनी मनोगत व्यक्त केले