(म्हसवड /प्रतिनिधी ) : येणाऱ्या बारा फेब्रुवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजता धनगर समाजाच्या एसटी आरक्षण व धनगड ह्या शब्दाचा मध्ये झालेली ड ऐवजी र हा शब्द दुरुस्ती साठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे यासह अनेक प्रश्नासाठी उपोषण कर्त्यासोबत तातडीने बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याबाबची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अधिकारी यांचेबरोबर होणार असल्याने १६ व्या दिवशी अनेक धनगर समाज्याचे नेते, युवा कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अमरण उपोषण तातपूर्ते स्थगित करण्यात येत असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले
धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश आहे परंतू धनगर ऐवजी धनगड अशी शब्दात झालेली चुक दुरुस्ती करण्यास राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी व घनगर समाज बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी हे आंदोसन सुरु होते.
धनगर समाजाचे नेते बालाप्रसाद( बाळासाहेब) किसवे बेल भंडाचे धनगर आरक्षण प्रश्नी म्हसवड उपोषणाला युवक बसले असल्याची माहिती मंगळवारी रात्री ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगीतली व त्यावेळी उपोषणकर्ते यांचे बरोबर फोनवरून चर्चा झाली उपोषण सोडा व सोमवारी १२ तारखेला मुंबई येथे बैठक घेऊन चर्चैला या असा निरोप दिला व त्यानंतर किसवे हे मुंबईहून म्हसवड येथे उपोषणकर्ते यांचे सह या उपोषणाला पाठबळ दिलेले शेकडो धनगर समाज बांधवांन बरोबर मुख्यमंत्री यांचा निरोप बबनदादा विरकर,डॉ. प्रमोद गावडे,दादासो दोरगे,बाळासाहेब मासाळ,बाळासाहेब काळे,अशोक राजगे , आप्पासाहेब पुकळे.तुषार विरकर, शरद गोरड, लुनेश विरकर, बाबासाहेब माने , पोपट रुपनावर डॉ.सुरेश मासाळ, डॉ बुरुंगले, पोपट मासाळ,काशिनाथ रुपनवर, आप्पासाहेब विरकर, विलास रुपनवर, आकाश विरकर, आदीच्या बरोबर किसबे,अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील,माणचे तहसिलदार विकास अहिर,म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने आदीनी चर्चा केली मात्र लेखी न आणल्याने बराच काळ्याकुट्ट होऊन हि उपोषण शुक्रवारच्या त्या रात्री जैसे थे राहिले.
काल शनिवारी दिवसभर समाजातील सर्व थरातील मंडळीनी चर्चा करून शनिवारी रात्री ९ वाजता धनगर समाजातील जेष्ठ कार्यकर्ते बबनदादा विरकर व दिपाली विरकर डॉ प्रमोद गावडे यांच्या हस्ते उपोषणकर्ते ऊत्तम विरकर,जयप्रकाश हुलवाल यांना सरबत देवून उपोषण स्थगित करण्यात आले मात्र आमच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या बैठकीत पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा याच ठिकाणी आक्रमक असे आंदोलन केले जाईल त्यास राज्य शासन जबाबदार असेल असे उत्तम विरकर जयप्रकाश हुलवाल यांनी सांगत आसताना यांचे डोळ्यात पाणी आले होते या उपोषणातील तीसरे आंदोलनकर्त्य गणेश केसकर हे हि यावेळी उपस्थित होते.
याबरोबरच या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी भेटी दिल्या त्या सर्व समाज बांधवांना बरोबर विविध पक्ष, विविध संघटना आमदार, अधिकारी आदींनी सहकार्य केलेबद्दल डॉ.प्रमोद गावडे यांनी आभार मानले गावोगावच्या धनगर समाज बाधवांनी भेटी देऊन उपोषण कर्त्यांना पाठींबा दिला याबरेबरच माण,खटाव,आटपाडी, माळशिरस इत्यादी तालुक्यातील धनगर समाज बांधव विशेषत: महिलांनी या आंदोलनात सहभागी होऊन या एसटी धनगर आरक्षण प्रश्नी पाठींबा दिलेबद्दल त्यांचेही आभार मानले.