हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत राॅयल इंग्लिश स्कूल जावलीचे सहा विद्यार्थी उत्तीर्ण

(जावली/अजिंक्य आढाव)- सन 2023/24 मधे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या “नॅशनल मेरीट कम मिन्स स्काॅलरशीप” (एन.एम.एम.एस) परीक्षेत जाई एज्युकेशन सोसायटी संचलित राॅयल इंग्लिश स्कूल जावली चे विद्यार्थी सानिका आशिष नाळे ,सार्थक किशोर पवार , प्रांजल सचिन गावडे, अनुष्का भारत गावडे, गायत्री सुधीर नलवडे, श्रावणी किशोरकुमार सांगळे असे सहा विद्यार्थींनी घवघवीत यश संपादन केले आहे.

एन एम एम एस परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा सत्कार करताना आई प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश तांबे , जाई एज्युकेशन सोसायटी संचलित राॅयल इंग्लिश स्कूल जावली चे संस्थापक अमोल चवरे, संचालिका कांचन चवरे, मुख्याध्यापक समीर गावडे , हेमंत काशीद व विद्यार्थी

या यशाबद्दल राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आई प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश तांबे सर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल संस्थापक अमोल चवरे, संचालिका कांचन चवरे , मुख्याध्यापक समीर गावडे, हेमंत काशीद सतीश गावडे , सर्व शिक्षक , उपशिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या परिक्षा घेण्याचा शासनाचा उद्देश निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळणार शिष्यवृत्ती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शाेध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते.निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ९ वी ते १२ पर्यंत दरमहा १ हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.

             शासनाचा उद्देश

ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षांसाठी ४८ हजार रुपये  देण्यात येतं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!