(फलटण/ प्रतिनिधी ) वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत बेकायदा तलवार हे शस्त्र बाळगल्याप्रकरणी व संशयास्पद वाठार गांवच्या हद्दीत फिरत असल्याने फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित अजय संजय जाधव( वय 23)मलटण व कुमार उर्फ गोटया तानाजी जाधव (वय 26) राहणार चौधरवाडी ता फलटण यांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 6 रोजी वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत वाठार फाटा येथे त्यांचे ताब्यातील टाटा मॅजिक नंबर एम एच 11 एल 98 29 संशयास्पद वावरत असताना मिळून आले. कुमार उर्फ गोटया जाधव याच्या कडे तलवार मिळून आली. सदर हत्यारा बाबत व गाडी बाबत विचारपूस करता त्यांनी माहिती चुकीची दिल्याने दोघाना ही पोलिसांनी अटक केली आहे.या बाबत पुढील तपास अडसूळ करतं आहेत.