हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सिध्दनाथ पतसंस्थेत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा १३ – ० ने दारुण पराभव करत एकहाती सत्ता मिळवली

(म्हसवड/ प्रतिनिधी) माण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या व येणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात असलेली माण तालुक्यातील अर्थ वाहिनी म्हणून सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे आ जयकुमार गोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मामूशेठ विरकर व शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी एकत्र येत सिध्दनाथ पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच पतसंस्थेच्या स्थापनेनंतर पहिल्यादांच परिवर्तन होऊन श्री सिध्दनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकत सत्ताधारी स्व. वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनेलचा दारुण पराभव करत एक हाती सत्ता

सिध्दनाथ पतसंस्था निवडणुकीसाठी बुधवार दि ३१ जानेवारी रोजी चुरशीने मतदान झाले. एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. सिध्दनाथ पतसंस्थेसाठी ११४०० मतदार पात्र होते. या ८६५६ मतदारांनी आपला हक्क बजावत ७५.९२ टक्के मतदान केले. त्यानंतर गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून श्री सिध्दनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनेलने सर्वच उमेदवार आघाडीवर होते. दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. यात सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणीनंतर गुलाल उधळत विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर जवळजवळ ३३ वर्षांनंतर प्रथमच परिवर्तन झाले आहे. तेरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री सिध्दनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. सिध्दनाथ पतसंस्थेत ‘परिवर्तन’ घडल्याचा जल्लोष विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून केला.

गुरुवार दि २ फेब्रुवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी संपली. निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करण्यात आला.

या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून महादेव कदम , अर्जुन काळे , चंद्रकांत जगदाळे , बापू जाधव , राजेंद्र जाधव , विजय जाधव , दत्तात्रय देशमाने , नारायण विरकर महिला राखीव मधून पूनम पोळ , नंदाबाई दडस इतर मागासवर्गीय मधून अरुण गोरे अनुसूचित जाती जमाती मधून जयवंत रोकडे व बाबासाहेब विरकर हे विजय उमेदवार विजयी झाले आहेत.

सिध्दनाथ पतसंस्थेत ३३ वर्षानंतर झालेल्या ‘परिवर्तन’चा जल्लोष दहिवडी, बिजवडी, शिंगणापूर, म्हसवड येथे आ गोरे व विजयी उमेदवार यांनी रॅली काढून मतदारांचे आभार मानले यावेळी तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी व गुलाबाची उधळण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!