हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सिध्दनाथ पतसंस्थेच्या ७५.९२टक्के झालेले मतदान सत्ताधारी गटाला तारणार कि विरोधकांना, याकडे सर्वांचे लक्ष..?

(म्हसवड /प्रतिनिधी) गेल्या महिन्यापासून माण तालुक्यात सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी सत्ताधारी गटाच्या स्व.वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनेलच्या विरोधात तिन गट एकत्र येवून सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी मोठी ठस्सल निर्माण झाली होती ती आज मतदाना केंद्रावर दिसून आली १ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा गुलाल कोणाच्या अंगावर दहिवडीचे पावण दैवत श्री सिध्दनाथ महाराज कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.

आज बुधवारी (दि.३१)रोजी १३ जागेसाठी झालेल्या २६ उमेदवारांना ११,४०० सभासदांपैकी ८६५६ ऐवढे मतदान होऊन ७५.९२ टक्के एवढे मतदारानी आपला हक्क बजावला आसून २,७४४ मतदान झाले नसले तरी झालेले मतदान सत्ताधारी पोळ गटाला तारणार कि विरोधी गटाने सत्ताधारी गटाचे सुनील पोळ यांच्या स्व. वाघोजीराव पोळकाका यांचा फोटो टाकून त्यांच्याच नावाने मते मागण्याचा विरोधकांना फायदा होणार कि बाप चोरला म्हणून तोटा होणार याकडे जिल्ह्याचे नव्हे महाराष्ट्राचे लक्ष लागले आसे म्हटले तरी वावगे ठरणारे नाही कारण सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात नंबर २ ची पतसंस्था म्हणून पाहिली जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे या पतसंस्थेच्या १३ जागांसाठी दाखल झालेल्या एकूण २६ उमेदवारांनी बुधवारी आपले नशीब आजमावले. ११,४०० सभासदांपैकी एकूण ८६५६ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये बिजवडी(३५६पैकी३१३),कुकडवाड(३४७पैकी२५९),बिदाल(३९२पैकी३१४),मार्डी(१७४पैकी१५०),महिमानगड(३९५पैकी ३१६), दहिवडी(२३९९पैकी१७६३),फलटण(१२०९पैकी८४७), कळंबोली(१२२पैकी७८), म्हसवड(१०२१पैकी ७८४), वडूज(४३७पैकी ३३८),कातरखटाव(१५०पैकी१२८),मलवडी (७४६पैकी६११),सातारा(५३२पैकी२९४),वावरहिरे(२४२पैकी२०९),नरवणे(२६५पैकी२१६), पुसेसावळी(१२६पैकी१०७)वरकुटेमलवडी(३०९पैकी२३६), लोणंद(२९८पैकी१९५), नातेपुते(३२६पैकी२५१)कराड(२५५पैकी१८६)कोरेगाव(४००पैकी३६३),शेवरी(२९३पैकी२४९), पुसेगाव(६०६पैकी४४९) असे एकूण ७५.९२ टक्के मतदान झाले.

श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनेल आणि स्व.वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनेल या दोन पॅनेलच्या एकूण २६ जणांमधून १३ जागांसाठी संचालकपदी कोण बसणार? उद्या(गुरुवारी,दि.०१)रोजी लागणारा निकाल सिद्धनाथ पतसंस्थेत सत्ता परिवर्तन करणार की सहकार बचावणार याबाबत सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले होते. सिद्धनाथ पतसंस्थेच्या या निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काय परिणाम होणार..? याबाबत सर्वसामान्य लोकांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!