माहिती व तंत्रज्ञान
म्हसवडला पाणी पुरवठा १५ दिवसातून एक वेळ , पालिका प्रशासन कोणाच्या सांगण्यावरुन म्हसवडकरांना त्रास देत आहेत ; कोण खरा सुत्रधार..?
ज्यांच्या हाती कारभार तेच पाणी टंचाईला जबाबदार असतात पाण्याचे आंदोलन करण्याची भाषा म्हणजे हश्यास्पद असून यापूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली ती आंदोलने मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारेच आंदोलन करण्याचे इशारे देवू लागले आहेत
(म्हसवड /प्रतिनिधी) – म्हसवडचा पाणी पुरवठा हेच खरे म्हसवडचे दुखणे असून आज २७ वर्षापूर्वी ४ फुट खड्यातुन म्हसवडची जनता पाणी भर होती २४ वर्षापूर्वी जिवन प्राधिकरणाची योजना सुरू झाल्यापासून कमीत कमी सहा ते आठ दिवसांनी पाणी शहरात पाणी पुरवठा होत होता मग उन्हाळा असो वा पावसाळा काहीच फरक पडला नाही वा प्रशासक महाशयांनी , सत्तेवर असलेल्या सत्ताधारी वा पालिकेच्या इंजिनियर यांनी कधी या योजनेकडे म्हसवडचे आसून हि लक्ष दिले नाही लक्ष केले सर्वानीच ते फक्त आपले कमिशन कसे मिळेल म्हसवडच्या जनतेच्या प्रश्नाचे या कोणाला कसलेच देणे नाही फक्त त्यांना एकच माहिती घेणे आॅक्टोबर मध्ये उरमोडीच्या पाण्याने तिन महिने तारले हे पुढे पाणी टंचाई होणार आहे हे माहीत असून हि कसलीच हालचाल का केली नाही सध्या नवीन पाणी योजनेची वाडी वस्तीवर पाईप टाकण्याचे काम तिन महिन्यापासून सुरू आहे त्याच्या ऐवजी नवीन पाणी योजनेची नवीन मेन लाइनची पाईप इस्लामपूर ते तारखेला फिल्टर टॅक पर्यंत टाकली असतील तर म्हसवड व परिसरातील जनतेला रोज पाणी मिळाले असते मात्र प्रशासक साहेबांना काम का करायचे नव्हते म्हसवडच्या जनतेला त्रास कोणाच्या सांगण्यावरुन देत आहेत कोण पोळी भाजत आहे या मागील खरा सुत्रधार कोण प्रशासक साहेब असा सवाल म्हसवडकर जनता करत आहे.
यापूर्वी पाण्यासाठी दोन आंदोलन झाली मात्र त्या आंदोलनाला मोजकेच नागरीक सहभागी झाले होते म्हसवडच्या जनतेला गांभिर्य केव्हा येणार मुळासकट ऊस अधिकारी यांनी खालल्यावर जागी होणार का प्रत्येक गोष्टीत राजकारण नागरीक पहातो त्या मुळेच म्हसवडची हि अवस्था निर्माण झाली आहे