(जावली /अजिंक्य आढाव) – तालुक्यातील मौजे दुधेबावी येथील भवानी माता डोंगरावर व परिसरात सन 2020 पासून वृक्ष प्रेमी पर्यावरण रक्षक दुधेबावी भूमिपुत्र सचिन सोनवलकर यांनी 4500 पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे त्यामुळे त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत राष्ट्रीय वनश्री पुरस्कार तसेच राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार व नुकताच नालंदा ऑर्गनायझेशन चा ट्री मॅन अवॉर्ड त्यांना घोषित झाला आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये श्री सचिन सोनवलकर यांचे उल्लेखनीय कार्य आहे वनराई जोपासण्यासाठी ते स्वखर्चाने, लोकवर्गणी व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये निखराचे प्रयत्न करत आहेत.नुकतीच श्री सचिन ढोले प्रांत अधिकारी फलटण यांनी भवानी माता डोंगर परिसराला भेट देऊन सचिन सोनवलकर यांनी केलेले कार्य पाहून त्यांचे खूप कौतुक केले व आपल्या कार्यासाठी शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले.
दुधेबावी ग्रामस्थांच्या वतीने श्री प्रांत अधिकारी सचिन ढोले यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच श्री त्रिंबकराव सोनवलकर तसेच कृषी सहाय्यक सुनील सोनवलकर ,सचिन जाधव, डॉ. संतोष कराडे, उत्तमराव सोनवलकर, भवानी मातेचे पुजारी हनुमंत खरात ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते