हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्राच्या खो-खो संघात राॅयल इंग्लिश स्कूल जावलीच्या किशोर गटातील ३ विद्यार्थ्यांची निवड

(जावली/अजिंक्य आढाव) – दि.28 रोजी स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अँड प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र यांच्या अतंर्गत पुणे कातोबा हायस्कूल या ठिकाणी घेण्यात आलेल्या किशोर गटातील खो-खो स्पर्धेत जावली ता.फलटण येथील राॅयल इंग्लिश स्कूल जावली च्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

किशोर गटातील १४ वर्षा खालील विभागातुन १८ संघानी सहभाग नोंदवला होता.आगामी होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांसाठी जाई एज्युकेशन सोसायटी संचलित राॅयल इंग्लिश स्कूल जावलीतील आदित्य कैलास चवरे (१४वय), कृष्णा अमोल गायकवाड ( ९वय), चैतन्य सचिन कारंडे (९ वय) या खेळाडूंची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेवेळी स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अँड प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष अजित कर्णे , मुख्य सचिव कुमासानू मुजुमदार , सचिव एस.ए‌. देशमुख , साळवे सर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचे जाई एज्युकेशन सोसायटी जावली चे संस्थापक अमोल चवरे, अध्यक्ष दशरथ चवरे,संचालिका कांचन चवरे, प्राचार्य समीर गावडे,क्रिडा शिक्षक महादेव वाघमोडे, गणेश तांबे,शशिकांत सोनवलकर,आप्पासाहेब ठोंबरे , दत्तात्रय गावडे, पालक व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!