क्रीडा व मनोरंजन
राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
(जावली/ अजिंक्य आढाव)- जावली ता. फलटण येथील राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जावली उपकेंद्राच्या माजी कर्मचारी शांता किर्वे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले तसेच आरोग्य सेविका निलम फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी राॅयल इंग्लिश स्कूल जावली चे संस्थापक अमोल चवरे सर , दशरथ चवरे(अध्यक्ष जाई एज्युकेशन सोसायटी) संचालिका कांचन चवरे ,आप्पासाहेब ठोंबरे ( अध्यक्ष पालक शिक्षक संघ) ,दत्तात्रय गावडे ( अध्यक्ष परिवहन समिती),शिल्पा सांगळे ( अध्यक्ष माता पालक संघ) शाळेचे मुख्याध्यापक समीर गावडे सर , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या प्रांजल गावडे व गायत्री नलवडे यांनी केले.प्राचार्य समीर गावडे सर यांनी प्रास्ताविक केले तसेच निलम फुले मॅडम यांनी आरोग्य याबद्दल माहिती सांगितली . विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वजगीत व संविधाना प्रस्ताविक , परेड ,कवायत, लेझीम, नृत्य सादरीकरण मनोगत व्यक्त केली. इयत्ता दहावीतील विद्यार्थींनी श्रुतिका गावडे हिने सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमा प्रसंगी सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.