(जावली/ अजिंक्य आढाव) – जिंती(ता.फलटण) गावच्या हद्दीत बुद्धविहार समाज मंदिराजवळ दि. 25 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मारहाण व शिवीगाळ व दमदाटी प्रकरणी परस्परविरोधी तक्रार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून दोन्ही बाजुच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विपुल कैलास रणवरे (वय 40 रा.जिंती) व आप्पा उर्फ सदाशिव गणपत कांबळे ( वय 36) राणी सदाशिव कांबळे (दोन्ही रा.जिंती ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, जिंती ता.फलटण गावच्या हद्दीत बुद्ध विहार समाज मंदिराजवळ दि.25 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास वरील आरोपी पैकी विपुल कैलास रणवरे (यांने कुस्त्यांच्या भांडणावरुन शिवीगाळ, दमदाटी, करून त्याने त्याच्या हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सदाशिव गणपत कांबळे यांनी पोलिसांत दिली.
दरम्यान याच घटनेची दुसरी तक्रार आप्पा उर्फ सदाशिव गणपत कांबळे व राणी सदाशिव कांबळे दोघेही रा.जिंती यांनी फिर्यादी विपुल कैलास रणवरे व आप्पा उर्फ सदाशिव कांबळे व त्यांची पत्नी राणी कांबळे पती पत्नी यांना फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात लोखंडी खुरपे मारुन त्यांना जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या घटनेचा अधिक तपास पो.ना.आडके करत आहेत.