हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

मुंजवडी येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला करत विष पाजण्याचा प्रयत्न ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

(जावली/ अजिंक्य आढाव) – मुंजवडी येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला तिला विषारी द्रव्य पाजण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती सासू-सासरे व नणंद या चौघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत तेजस्विनी सूर्यकांत गुजले (रा.मुजंवडी ता. फलटण ) या पीडित महिलेने दिली आहे. या हल्ल्यात विवाहित जखमी झाली आहे. पती सूर्यकांत विलास गुजले सासु राधाबाई विलास गुजले , सासरे विलास गुलाब गुजले सर्व राहणार मुंजवडी तालुका फलटण व नंणद हिराबाई उर्फ साधना शिवाजी उर्फ लखन चव्हाण राहणार चंद्रपूरी ता.माळशिरस जिल्हा सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ऑक्टोबर 2021 पासून ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत मुंजवडी तालुका फलटण येथे वरील सर्व आरोपींनी मला लग्नामध्ये राहिलेले दहा तोळे सोने दिले नाही तसेच घरातील कामाचे व शेतामध्ये जाण्याचे कारणावरून सतत शारीरिक, मानसिक त्रास देऊन जाचहाट करून हाताने मारहाण केली आहे , तसेच दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पती सूर्यकांत व सासरे विलास यांनी माझे दोन्ही हात पकडून मला खाली पाडले व सासू राधाबाई व नणंद हिराबाई उर्फ साधना यांनी माझे तोंड उघडून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व त्या झटापटीत गळ्यास व गालास ओरबडले आहे.अशी तक्रार विवाहितीने दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वरील चौघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ई.पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!