हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आसु ता. फलटण येथे “शिवरुपराजे केसरी “भव्य बैलगाडा स्पर्धाचे आयोजन

"शिवरुपराजे केसरी" चा कोण ठरणार मानकरी..?

(जावली/अजिंक्य आढाव) फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुप राजे उर्फ बाळराजे यांचा 56 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. 25 जानेवारी रोजी आसु ता. फलटण येथे “शिवरुपराजे केसरी “भव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दि. 25 रोजी फलटण ता.आसू येथे “शिवरुप राजे केसरी” भव्य बैलगाडा शर्यत विक्रीकर आयुक्त रघुवीर (आप्पा) माने- पाटील मित्र परिवारच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 8 वाजता बैलगाडा शर्यतीला सुरूवात होणार असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस कै.नारायणराव दादासो यांच्या स्मरणार्थ धर्मवीर संभाजीराजे युवक प्रतिष्ठानच्या वतीने १ लाख ११हजार १११ रुपये व्दितीय क्रमांकांचे बक्षीस महेश भानुदास कदम यांच्या कडून ७७ हजार ७७७ रुपये , तृतीय क्रमांकाचे बक्षीस दत्तात्रय लालासो भोई व विलास भोई यांच्याकडून ५५ हजार ५५५रुपये , चतुर्थी क्रमांकाचे बक्षीस माजी चेअरमन प्रमोद सदाशिव झांबरे यांच्या कडून ४४हजार ४४४रुपये पाचव्या क्रमांकाचे बक्षीस हनुमंत बुवासो फाळके यांच्या कडून ३३हजार ३३३रुपये सहाव्या क्रमांकाचे बक्षीस विजयकुमार रसिकालाल शहा यांच्या कडून २२ हजार २२२रुपये सातव्या क्रमांकाचे बक्षीस जगन्नाथ नाथा ताम्हाणे व तानाजी सुर्यकांत पवार यांच्या कडून ११हजार १११रुपये देण्यात येणार असून कै.सनी स्वामीनाथ साबळे यांच्या स्मरणार्थ विकास साबळे यांच्या कडून प्रथम क्रमांकाचे गाडी ड्रायव्हर साठी सोन्याची अंगठी बक्षीस देण्यात येणार असून बैलगाडा शर्यतीला पंचक्रोशीतील व महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.अशी आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. बैलगाडा शर्यत संपल्यानंतर आपल्या निवासस्थानी शिवरुपराजे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!