(कोळकी/प्रतिनिधी )- अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने विडणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विडणी येथे सोमवार दि. २२ रोजी विडणी सोसायटी व विडणी ग्रामपंचायत यांच्यावतीने श्रीकृष्ण मंदिर येथे दुपारी १२ ते २ धार्मिक विधी २ ते ५ भजन सेवा सायंकाळी ५ ते ७ प्रभू श्रीराम भव्य मिरवणूक सायंकाळी ७ वाजता प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास मा.सभापती विधान परिषद रामराजे निंबाळकर , आमदार दिपकराव चव्हाण रघुनाथराजे निंबाळकर , संजीवराजे निंबाळकर , शिवरूपराजे खर्डेकर , विश्वजीत राजे निंबाळकर , सत्यजित राजे निंबाळकर , डॉ.बाळासाहेब शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उत्तरेश्वर मंदिर समोर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपसरपंच सुनील अब्दागिरी यांनी माहिती दिली.