(म्हसवड /प्रतिनिधी) शिंगणापूर – दहिवडी रोडवरील वावरहिरे घाटा मध्ये पाण्याच्या टाकीजवळ विटांनी गच्च भरलेल्या दोन ट्रॉली शिंगणापूर वरुन दहिवडी कडे निघाली असताना लोड जास्त असल्याने व घाट असल्याने ट्रॅक्टर सोबत असलेले पती पत्नी ट्रॅक्टर मधून खाली उतरून चालत निघाले असताना अचानक चालत निघालेल्या पती पत्नीच्या अंगावर विटानी भरलेली टायली पडली या मध्ये मजूर महिला ठार झाली तर तीचे पती या अपघातातून वाचले असून या दुर्दैवी घटनेने वावरहिरे परिसरात व मांडवे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटना स्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे या घटनेचा तपास करत आहेत .
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांडवे ता. माळशिरस या माने यांच्या विट कारखान्यातील दोन ठिकाणाहून विटांनी गच्च भरलेला दोन ट्रॉली व एक ट्रॅक्टर क्र.एम.एच.11 यु.8830 हा शिंगणापूर वरुन दहिवडीच्या दिशेने वावरहिरे घाटातील चढावर दोन विटानी भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये लोड जास्त असल्याने ट्रॅक्टर मध्ये ड्रायव्हर माने व त्याचे बंधू व मजूर वाघमारे पती पत्नी असे चौघे होते त्यामुळे मजूर पती पत्नी ट्रॅक्टर मधून खाली उतरून चालत निघाले असताना विटानी भरलेला लोड असलेला ट्रॅक्टराच्या ट्रॅली ट्रॅक्टर मधून चालत निघालेल्या पती पत्नीच्या अंगावर विटानी भरलेली ट्रॅली पडल्याने या मध्ये पत्नी रंजना वाघमारे जागीच ठार झाल्या तरी पती या घटनेतून बचावले ट्रॅक्टर चालक मालक अमोल माने आणि संतोष माने हे दोघेही (रा.मांडवे,ता.माळशिरस) घटनास्थळावरून निघून गेले होते वाघमारे पती पत्नी हे दोघे ही मूळचे नांदेड येथील असून कामा निमित्त दोघे मांडवे येथील विट भट्टी कारखान्यावर काम करत होते या दुर्दैवी घटनेचा मध्ये मजूर पत्नी रंजना या मयत झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून हा अपघात होताच वावरहिरे येथील नागरिकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या संदर्भात पोलीस पाटील यांनी दहिवडी पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क केला. त्याचवेळी दहिवडीहून दहिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान पोलीस पाटील यांनी रुग्णवाहिकेला केलेल्या संपर्कानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि मयत व्यक्तीचे प्रेत हे पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले , अशी माहिती