(म्हसवड /प्रतिनिधी) : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसवड पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नामांकित असलेल्या एका काॅलेज मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालय अल्पवयीन मुलीला विरकरवाडी चौक ते देवापूर दरम्यान एका अनोळखी महाविद्यालयीन तरुणाने तीला रस्त्यात एकटीला गाठून तु मला आवडते, तु माझ्या सोबत प्रेम संबध ठेव असे म्हणत तीचा किस घेत तीला आपल्या जवळ ओढत तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे करत तुझे माझ्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिल्या प्रकरणी संजीव महादेव घुटुकडे रा. मोटेवाडी ता. माण जि. सातारा याचेवर लोकसभा अंतर्गत गुन्हा आज म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी दिनांक १५ जानेवारी रोजी काॅलेज सुटल्यावर सदर अल्पवयीन मुलगी म्हसवडकडे येत असताना सांयंकाळी ६.३० च्या दरम्यान देवापूर ते विरकरवाडी चौक दरम्यान अनोळखी महाविद्यालयीन युवकाने अल्पवयीन मुलीला अडवून रस्त्यात एकटीला गाठून तु मला आवडते, तु माझ्या सोबत प्रेम संबध ठेव असे म्हणत तीचा किस घेत तीला आपल्या जवळ ओढत तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे करत तुझे माझ्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिल्या प्रकरणी संजीव महादेव घुटुकडे रा. मोटेवाडी ता. माण जि. सातारा यांचे विरोधात आज शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि विभुते शिवाजीराव करत आहेत.