हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

येत्या पाच वर्षांत सातारा इंडस्ट्रीअल हब करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई बंगळूर महामार्गाची तयार केला जात आहे.

(जावली/अजिंक्य आढाव) – राज्य शासनाकडून मुंबई – बंगळूर या नवीन कॅरिडोअरची   तयारी केली जात आहे. पुढील सर्व इंडस्ट्री सातारा जिल्ह्यामध्ये येतील जिल्ह्यामध्ये जिथे नवीन एमआयडीसीची मागणी आहे त्या सर्व एमआयडीसींना मान्यता देऊन त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याची काम आम्ही करीत आहोत आगामी पाच ते सात वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार झालेली आपणास पाहिला मिळेल जिल्ह्यातील प्रत्येक लोक हिताचे योजना या प्रकल्पांना आर्थिक पाठबळ बी करून देण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने मी करीन हा शब्द तुम्हाला देण्याकरता आज फलटण या ठिकाणी मी उपस्थित आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण येथील वचन स्पुर्त सोहळ्यात बोलत होते. फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय मी अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती असं ते त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत. फलटणचं पाणी वळवून आपल्या मतदारसंघात नेल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यावर होतो. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केल्याने त्यांचा अंगुली निर्देश नेमका कुणाकडे शरद पवार की अजित पवार ? याची चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस…?

“फलटणमधला दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम आपण केलं आहे. प्रभू रामाच्या काळात म्हटलं जायचं की प्राण जाए पर वचन न जाए. आम्ही वचन दिलं होतं की काहीही झालं तरीही तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मी आजवर अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी पाहिली ऐकली नव्हती. मी पाटबंधारे खात्याचा मंत्री असलो तरीही गृहमंत्रीही आहे. त्यामुळे चोरी पकडून दंडित करण्याची जबाबदारी माझीच आहे. जे तुमच्या पर्यंत पोहचवलं त्याला २३ वर्षे लागली. ज्या प्रकारचा संघर्ष इथल्या नेत्यांनी केला आहे, त्याची परिणीती आपल्याला दिसते आहे. १९८४ मध्ये हा प्रकल्प ६१ कोटींचा होता. तो आता हजारो कोटींचा झाला. ३ हजार ९७६ कोटींचा हा प्रकल्प झाला. पण तो पूर्णत्वाकडे चालला आहे. या कामासाठी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पैशांची कमतरता पडू देणार नाही. वीरा देवधर असो किंवा या भागात वेगळी धरणं असतील या सगळ्या धरणांना आणि याच्या कामांना चालना देण्याची संधी मला मिळाली. मी जेव्हा इथला भागही नीट पाहिला नव्हता” असंही फडणवीस म्हणाले.

पुराचं पाणी कुणाच्या मालकीचं नाही

“पुराचं पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून त्यावरून आम्ही योजना करण्याचे आखली. हे दुष्काळी भागाकडे वळवलं तर मोठा फायदा होईल. ३३०० कोटींचा प्रकल्प आहे त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. पुराचे पाणी शहरात शिरणार नाही त्याचा फायदा १० लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. ४ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली यावी हा आमचा प्रयत्न आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रोजगाराच्या संधी प्राप्त होणार

“रस्त्यांच्या जाळ्यात देशात आठवा मतदारसंघात माढाचा प्रश्न होता. रेल्वे तयार होती पण चालली नाही कुणी अडवली माहीत नाही. आपण नवीन कॉरिडॉर करतो आहोत, त्यामुळे रोजगार इथे येणार आहेत. या भागात उद्योग आणण्याचे काम करतो आहे. रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. जे काम करतात त्यांना आशीर्वाद द्या, आम्ही या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. दुष्काळ संपवण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. शेतीच्या बांधावर पोहचवणार तोपर्यंत शांत बसणार नाही”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!