हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

बीड जिल्ह्यातील दलित वृध्द ऊसतोड कामगाराची हत्या करणाऱ्या मोकाट आरोपींना तात्काळ अटक करावी . अन्यथा फलटण तालुक्यातील होलार समाजाचा आंदोलनाचा इशारा

(फलटण/ प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दौंडवाडी गावातील अनुसूचित जातीतील होलार समाजातील ६५ वर्षीय वृध्द ऊसतोड कामगार दिगंबर पारसे यांना त्यांच्या मुकदमाने व साथीदारांनी बेदम मारहाण करून ऊसतोड कामगाराच्या घरी मोटरसायकलवरून पडल्याचे सांगून मुकदम व साथीदार तेथून फरार झाले.

त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर निदर्शनास आले की दिगंबर पारसे अस्वस्थ झालेले आहेत.त्यांच्या शरीरावर एकही घाव व जखम नव्हती त्यांच्या गाडीला थोडाही क्रॅश झालेला नव्हता.ते इशारा – हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करीत होते की डोक्यात मारले आणि गळा दाबला असे ते सांगत होते. ते आठ ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना मुक्कामार दिला आहे आणि त्यांच्या बॉडी मध्ये इंटरनल ब्लडिंग होत आहे .त्यांना सुनियोजितपणे संपवले आहे. आरोपी मुकादम व गाडी मालक आणि एक व्यक्ती त्यांना मारून घटनास्थळावरून पसार झाले आहेत त्यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु एक महिना उलटून गेला तरी अद्याप एकही आरोपी अटकेत नाही.

दिगंबर पारसे अनुसूचित जातीचे असल्यामुळे ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे होती परंतु अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी दाखल केलेली नाही तरी पोलीस अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी दाखल न करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहिजे व तात्काळ एफ .आय. आर. मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट ॲड करून कलम वाढवले पाहिजे.
अनुसूचित जातीतील वृद्ध ऊसतोड कामगार दिगंबर पारसे यांचे मारेकरी एक महिना उलटून गेला तरी आरोपींना अटक झाली नाही हे अतिशय निंदनीय आहे. या आरोपींना प्रशासनाने तात्काळ अटक करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे .अन्यथा होलार समाज यंग ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल. असे फलटण तालुक्यातील होलार समाजाच्या वतीने निवेदन दिले.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना बीड जिल्ह्यातीलच दलित ऊसतोड कामगार असुरक्षित आहे . ही बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे अशी खंत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी व्यक्त केली. यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे सातारा जिल्हा संघटक गणेश गोरे , पत्रकार सुरज गोरे, राहुल आवटे, सुनिल जाधव , जगन्नाथ गायकवाड , तुषार गोरे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!