हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आर्किटेक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओंकार चोरमले  “प्रेरणा चषकाने” सन्मानित

(जावली/अजिंक्य आढाव) आर्क्टिटेकचर क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल एस.बी. पाटील काॅलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयाने आर्क्टिटेक चि.ओकांर चोरमले यास “NICMAR” युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट आर्क्टिटेक अनिल कश्यप यांच्या शुभहस्ते व एस बी पाटील काॅलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणा चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

चि. ओंकार हा एस.बी पाटील काॅलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन निगडी पिंपरी चिंचवड या महाविद्यालयाचा २०१५ ते २०२० या बॅचचा विद्यार्थी असून त्याने आर्क्टिटेक ही पदवी डिस्टिंक्शन ने पास केली आहे. तो आपल्या क्षेत्रा मध्ये दिवसेंदिवस उल्लेखनीय कामगिरी करत असुन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

खरं तर एस.बी पाटील काॅलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालया मधुन‌ प्रतिवर्षी डिग्री घेऊन जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार दिला जातो.

आर्किटेक ओंकार दादासाहेब चोरमले हे आस्था टाईम्स कार्यकारी संपादक दादासाहेब तथा श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले व फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ .वैशाली चोरमले यांचें चिरंजीव आहेत.

आर्क्टिटेक ओंकार चोरमले यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य विक्रीकर विभागाचे व अतिरिक्त सचिव हर्ष कुमार निकम , महाराष्ट्र राज्य दारुबंदी व उत्पादन शुल्कचे संचालक सुनील चव्हाण, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे निंबाळकर फलटण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष निताताई नेवसे , फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र माजी अध्यक्ष रणधीर भोईटे, बिल्डर असोसिएशन संस्थापक प्रमोद आण्णा निंबाळकर, विक्रम शेठ झांझुरणे, बिल्डर जावेद भाई तांबोळी, इत्यादी सह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!