हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

लक्ष्मी पतसंस्थेकडुन महिलांना सत्यशोधक चित्रपट मोफत पाहण्याची संधी ; मकर संक्रांतीची अनोखी भेट

(कोळकी /प्रतिनिधी)- लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सत्यशोधक चित्रपट महिलांना मोफत दाखवून मकर संक्रांतीच्या सणाची महिलांना भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

थोर महापुरुषाचे विचार त्यांनी केलेला त्याग नवीन पिढीला पाहता यावे या उद्देशाने विडणी येथील लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन डॉ.सुचिता शेंडे श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार व प्रेरणेतून सत्यशोधक चित्रपट विना शुल्क मोफत फलटण येथील चित्रपट ग्रृहात दाखवण्या बाबत विडणी येथील महिलांना आवाहन केले यास महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन सत्यशोधक चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.

लक्ष्मी महिला पतसंस्थेचे वतीने सत्यशोधक चित्रपट महिलांना दाखवून सामाजिक बांधिलकी जोपासून मकर संक्रातीचे सणाचे महिलांना वेगळी भेट दिली.
फोटो – चित्रपट पाहण्यासाठी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद(छाया सतीश कर्वे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!