हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

साखरवाडी ता. फलटण येथील अवैध ताडी विक्री प्रकरणी एकास अटक

(जावली/ अजिंक्य आढाव) साखरवाडी ता. फलटण येथील अवैध ताडी विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित नागराज उद्यापा भंडारी रा.साखरवाडी याला अटक केली आहे.

या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार दि.१३ रोजी दुपारी १वाजता साखरवाडी ता.फलटण जि.सातारा येथील संशयित नागराज उद्यापा भंडारी यांच्या घरी छापा टाकला असता त्याच्याकडे ९०० रुपये किंमतीचा ९ लिटर ताडीचा माल आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलिस फौजदार हांगे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!