हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकराचां निषेध

(जावली/अजिंक्य आढाव) – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) विरोधात दिलेल्या निकाला विरोधात शिवसेना ठाकरे गटातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी फलटण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध नोंदवला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी घेतली. त्यांनी दिलेला निर्णय म्हणजे घटना व कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष विकास नाळे यांनी यावेळी जाहीर निषेध व्यक्त केला.. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. विधानसभा अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध केला .नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. भाजपचे शिवसेना संपवण्याचे षडयंत्र जनता हाणून पाडेल,असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे फलटण तालुका प्रमुख श्री विकास नाळे, शहर प्रमुख श्री. निखिल पवार, युवासेना उप जिल्हा अधिकारी श्री. ऋषिकेश शिंदे , शिव आरोग्यसेना जिल्हा सचिव श्री.शैलेंद्रदादा नलावडे, ग्राहक संरक्षण कक्ष उप जिल्हा प्रमुख श्री. भारत लोहाना, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघाटिका सौ.सुशीला जाधव, माथाडी कामगार सेना तालुका प्रमुख श्री नंदकुमार काकडे, महिला आघाडीच्या फलटण तालुका संघटीका लताताई तावरे, युवासेना फलटण तालुका अधिकारी श्री अभिजित कदम, श्री.अक्षय तावरे शहर समन्वयक युवासेना, उप शहर प्रमुख श्री राहुल पवार, उप तालुका प्रमुख श्री ज्ञानेश्वर (माऊली) घाडगे, युवासेना उप तालुका अधिकारी श्री.महिंद्रा घाडगे व श्री.अभिजित मोरे,विभाग प्रमुख श्री. मच्छिंद्र भोसले व श्री.तुषार वाडकर, युवासेना उप शहर प्रमुख श्री. पवन माने, युवासैनिक चैतन्य दळवी तसेच .सुरज भोसले, श्री .दिपक कदम, श्रीकर चव्हाण आदी शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!