(फलटण/ प्रतिनिधी) -कोळकी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ. सपना कोरडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये सरपंच पदासाठी सौ. अपर्णा विक्रम पखाले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोळकीचे मंडलाधिकारी नामदेव नाळे यांनी कामकाज पाहिले. यावेळी कोळकीचे तलाठी सचिन शिरसागर तर ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांची उपस्थिती होती. सौ अपूर्ण पखाले यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक राव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मिलिंद नेवसे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.