हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

वार्षिक स्नेहसंमेलनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळतो – डॉ. संतोष भोसले अध्यक्ष – आय.आय. केअर फाऊंडेशन

खुदी को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले 'खुदा बंदे' से पुछे बता तेरी रजा क्या है..! - गणेश तांबे

(जावली/अजिंक्य आढाव)भारत देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल होत आहे, शहरी व ग्रामीण भागातील तफावत दूर करण्यासाठी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज आहे.मार्गदर्शन करताना डॉ. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात लपलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण आणि नवीन्यपुर्ण घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षक करत असतो, स्नेसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करू, डॉ संतोष भोसले आय.आय. केअर फाऊंडेशनचे संस्थापक यांनी शब्द दिला.

 

गणेश तांबे सर मार्गदर्शन करताना

शाळेतील शिक्षक म्हणजे क्रमिक अभ्यास नव्हे त्या बरोबर सह अध्यायी , निकोप स्पर्धा, विद्यार्थी व शिक्षक यांचा संवाद कला कौशल्य सदर करणे , क्रीडा, मैत्री, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंगाला सामोरे जाणे , याला शिक्षण म्हणतात.केवळ राॅयल इंग्लिश स्कूल शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थी शिक्षक कुटुंबातील घटक आहेत – अमोल चवरे, राॅयल इंग्लिश स्कूल संस्थापक

ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील फलटण पूर्व भागातील जावलीचे एक तरुण,उमदे व्यक्तिमत्व अपार कष्ट आणि जिद्द चिकाटी आत्मविश्वास या सुत्रांच्या आधारावर गुणवत्तेचा ध्यास घेऊन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमोल चवरे सर होय. असे प्रतिपादन आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे यांनी केले , आकाशाला गवसणी घेणारी स्वप्ने ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात. खूप कमी वयामध्ये आपण शिक्षणामध्ये क्रांती घडवत आहात.

त्याचबरोबर अमोल आपल्या शैक्षणिक कार्याविषयी लिहिण्यास शब्द अपुरे आहेत असे कार्यक्रमा वेळी बोलताना मनोगत व्यक्त केले.अमोल दशरथ चवरे सर हे माझे विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान – श्रीमती भारती धुमाळ, यावेळी शाळेतील राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने देण्यात येणारा, प्रतिष्ठेचा मानला जाणारा रॉयल टीचर ऑफ द इअर पुरस्कार- हेमंत काशीद, रॉयल स्टुडंट् ऑफ द इअर- श्रुतिका दत्तात्रय गावडे, रॉयल प्लेअर ऑफ द इअर आदित्य कैलास चवरे यांना असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनरावजी डांगे बोलत होते की या सरांचे अनेक विद्यार्थी क्लास वन,क्लास टू अधिकारी झाले आहेत त्यामध्ये अनुराधा गावडे तसेच विकास मुळीक हे अधिकारी विद्यार्थी सत्कार मूर्ती म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते कांचन मिस यांनी त्यास आमंत्रित केले वार्षिक स्नेहसंमेलनच्या वेळी देशभक्ती वरील गाणी, मराठी लावणी, हिंदी चित्रपटातील गाणी, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या कला गुणांना वाव दिला.

राॅयल बेस्ट टीचर चा अवार्ड स्विकारताना हेमंत काशीद सर

 

राॅयल इंग्लिश स्कूल जावली चे संस्थापक, प्राध्यापक कार्यक्रमा वेळी एकत्रितपणे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले यावेळी रॉयल इंग्लिश स्कूल चे प्राचार्य समीर गावडे यांनी प्रास्तविक केले व या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष- दशरथ चवरे, आप्पासाहेब ठोंबरे, दत्तात्रय गावडे आदी उपस्थित होते तसेच प्रकाश चवरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व पालक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांचे सहकार्य लाभले व काळुखे सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!