हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

फलटण तालुक्यात कायदा सुव्यवस्थेच उल्लंघन करणाऱ्या ५० जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई

कारवाई अधिक कडक करण्याचा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा इशारा

(जावली/ अजिंक्य आढाव) – कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस कडून कारवाई चा धडका सुरू असुन दारू पिऊन गाडी चालवणे ,दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणे , तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे , बाजारपेठत गाडी लावून वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा बेशिस्त लोकांना गेल्या सात दिवसांपासून पायी पेट्रोलिंग करत कारवाई करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना दिली आहे.

रोज सायंकाळी पायी पेट्रोलींग करतं असुन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे रोडवर जाऊन त्या ठिकाणी गर्दीमध्ये अस्तव्यस्त वाहने लावणारे लोक तसेच दारू पिऊन वाहने चालवणारे लोक किंवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे लोक तसेच बेकायदेशीर सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणारे लोक तसेच असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई केली जाते ग्रामीण पोलिसांनी 2024 च्या नववर्षापासून या सर्व कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम 283 प्रमाणे अस्तव्यस्त वाहन लावणाऱ्या लोकांच्यावर तसेच दारू पिऊन वाहन चालणाऱ्या लोकांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे व सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्या लोकांच्यावर दारूबंदी कायदा कलम 85 प्रमाणे सात दिवसात 50 कारवाया केलेले आहेत व यापुढेही वेगवेगळ्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी या कारवाया केल्या जातील.

सदर कारवाई माननीय प्र पोलीस अधीक्षक अचंदलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक फलटण ग्रामीणला नेमणुकीला असलेले दुय्यम अधिकारी रांगत हुलगे पाटील दीक्षित आरगडे व सर्व स्टाफ करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!