(फलटण/प्रतिनिधी) फलटण तालुक्यातील फलटण शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत बेकायदा जनावरांची कत्तल करून मासांची विक्री करणारे टोळी प्रमुख मुबारक हानिफ कुरेशी वय ३३वर्ष टोळी सदस्य शाहरुख जलील कुरेशी ३० व आजिम शब्बीर कुरेशी वय ३४ सर्व .रा कुरेशीनगर मंगळवार पेठ फलटण ता.फलटण जि.सातारा यांच्या वर सातारा जिल्ह्यामध्ये टोळीने बेकायदा जनावरांची वाहतूक करुन कत्तल व मांस विक्री करणे बाबतचे सातत्याने गुन्हे करीत असल्याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल शेळके, व फलटण शहर पोलिस ठाणे. यांनी सदर टोळी विरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ७५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या टोळीला जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.