हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

समाजात स्त्रियांना शिक्षणाचे धडे देण्याचे धाडस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दांपत्यांनी सुरू केले – संजीवराजे नाईक निंबाळकर

(कोळकी /प्रतिनिधी )- मुली व समाजातील अनेक घटकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही अशी एकेकाळी मानसिक भावना होती. अशा काळात मुलींना शिक्षण द्यायचे धाडसी पाऊल महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उचलले स्त्री शिक्षणाची कवाडे उघडे केल्याने आज खऱ्या अर्थाने फुले दांपत्य युगपुरुष असल्याचे मत संजीव राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलवते. यावेळी सहदेव शेंडे बाळासाहेब शेंडे ,सर्जेराव नाळे मारुती नाळे, अनिल शेंडे ,शुभांगी शिर्के कृष्णा शेंडे , हरिभाऊ शेंडे ,सुनिल अद्धागिऱे प्रेमजीत अभंग तुकाराम अद्धागिऱे सचिन कोकरे दिलीप अभंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सहदेव शेंडे म्हणाले की सावित्रीबाईंच्या जयंती निमित्ताने विद्यालयाच्या वतीने गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान शाळेमध्ये विविध स्पर्धा राबवले विद्यालयाचा शैक्षणिक गुणवत्ता बरोबर क्रीडा स्पर्धेत मुलांनी राज्यस्तरीय बाजी मारली विद्यालयात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याने ही सावित्रीबाई मुळे चित्र पाहावयास मिळत आहे.

डॉ. शेंडे म्हणाले की फुले संपत्त्याने लोकांचा विरोध पत्करून शाळा सुरू केल्या फुले दांपत्यामुळेच शिक्षण प्रवाहात आपण आज येऊ शकलो आज महिला व पुरुष प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिक्षणाचे खरे जनक फुले दांपत्य मुळेच आज बदल दिसून येत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पवार यांनी केले तर आभार वैभव शेंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!