हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

जगन्नाथ गावडे (पाटील) यांचे निधन

(गोखळी/ प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती ह.भ.प. जगन्नाथ सोपानराव गावडे ( पाटील) वय ७५ यांचे अल्पसा आजारपणामुळे निधन झाले.

गोखळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद , तसेच खटकेवस्ती स्वातंत्र्य ग्रामपंचायत झाले नंतर खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून पद भुषविले होते.सामाजिक , धार्मिक, राजकीय कार्यात सहभागी होत त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा,चार विवाहित मुली, दोन विवाहित भाऊ भावजय नातवंडे असा मोठा परिवार आहे.घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण बारामती पुरंदर, दौंड, इंदापूर, मुंबई , माळशिरस तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, कृषी, राजकीय क्षेत्रातील समाजबांधव उपस्थित होते.गोखळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!