हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

गोखळी येथे सावित्रीबाई फुले जयंती ‘ बालिका दिन ” म्हणून साजरी

(गोखळी /प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती ” बालिका दिन “साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हरीभाऊ अभंग सर उपस्थित होते.

विद्यालयातील ३ जानेवारी रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यालयातील इयत्ता ८ वीतील विद्यार्थीनींनी कु. श्रावणी राऊत हिच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी ओम थोरात , कु.सत्वशिला कुलथे सानिका निकम , समीक्षा धनावडे, श्रेयश गावडे,साहिल गावडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील सस्ते सर, मोहन ननवरेसर,प्राध्यापिका शुभांगी बोंद्रे -भोसले मॅडम, किरण पवार सर यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.आभार किरण पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!