(जावली/ अजिंक्य आढाव) – राज्यात पोलीस निरीक्षकांची ३०% पदे रिक्त आहे. गृहमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी पोलीस मित्र संघटन नवी दिल्ली भारत यांच्यातर्फे निवेदनद्वारे करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदावर दोन वर्षात पदोन्नती देण्यात आली नाही. पोलीस महासंचालक कार्यालयाने ऑगस्ट 2023 पर्यंत निर्माण होणाऱ्या 678 पोलीस निरीक्षकांच्या रिक्त पदीसाठी 21 मार्च 2023 रोजी अधिकाऱ्यांची निवड करून ग्रह विभागास पाठवली होती यानंतर एप्रिल 2023 मध्ये पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची विनंती केली.
यात न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या 84 पदांना सोडून किमान उर्वरित पदांचे आदेश काढावे अशी विनंती केली. मात्र गृह विभागाने यात कोणतीही कारवाई केली नाही. याचा संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस महासंचालकांनी 14 डिसेंबर रोजी 678 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची महसूल विभाग ची पसंती 15 डिसेंबर पर्यंत म्हणजेच एकाच दिवसात पाठवण्याच्या आदेश पोलीस अधीक्षक व आयुक्तांना दिले आहेत.
678 जणांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळावी अशी मागणीपोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटने कडून केली आहे व याबाबत पाठपुरावा केला जाईल असे
गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली भारत यांनी निवेदनाद्वारे सांगितले.फलटण पोलीस स्टेशन येथे निवेदन देताना संघटनेचे सर्व पदाधिकारी रवींद्र लिपारे, राकेश कदम नंदकुमार रेवले वाणी , रमेश गोसावी संजय गायकवाड़ ,विराज इंगळे ,राजा शिंदे यशवंत इंगळे ,अम्महद भाई शेख ,विजय गायकवाड़ राजु गायकवाड़ ,विजय भंडलकर अम्महद शेख ,आदम शेख इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते