हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सकारात्मक दृष्टिकोनातुनच यश प्राप्ती – शशिकांत सोनवलकर ; चवरे केमिस्ट्री क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ संपन्न

(जावली/ अजिंक्य आढाव) –  फलटण तालुक्यातील अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या चवरे केमिस्ट्री क्लासेसच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांंचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जीवन जगत असताना आपल्यासाठी कष्ट केलेल्या आई व वडिलांचे सतत स्मरण ठेवा असे प्रा.अमोल चवरे सर यांनी मनोगत व्यक्त केले, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते , विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात पारंगत व्हावे असे मार्गदर्शन केले.

दि.29 रोजी दुपारी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर सर उपस्थित होते, मार्गदर्शन करताना ते बोलत होते अमोल चवरे सरांनी योग्य ध्येय ठेवून शैक्षणिक वाटचाल केली अथक परिश्रम , चिकाटी हेचं यशाचं खर गमक आहे असे गौरवोद्गार सोनवलकर सर यांनी काढले. तसेच सोनवलकर सरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अमोल चवरे सर हे प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी असून ते खूप कष्टाळू व ध्येयवादी आहेत असे मनोगत व्यक्त केले.

फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी चवरे सरांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून सहकार्य करत , 23 एप्रिल 2012 रोजी केमिस्ट्री क्लासेसची सुरुवात केली .आज अनेक विद्यार्थी अधिकारी वर्गात , सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.

याचबरोबर विद्यार्थ्यांनी भाषणं करून गुरू बद्दल भावना व्यक्त केल्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक एका वाक्यात सरांचा स्वभाव कैद करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे “तू देत रहा मोठा होशील” हे त्याच्या आईवडिलांचे वाक्य आज ते खऱ्या अर्थाने त्या वाक्याप्रमाने जीवन जगताना दिसतात असे प्रतिपादन सोनवलकर सरांनी केले, त्यावेळेस जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थी उपस्थित होते, निरोप समारंभ वेळी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमा वेळी राॅयल इंग्लिश स्कूल चे प्राचार्य समीर गावडे,खटके सर ,काळोखे सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!