हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

संपत्तीच्या मागे न लागता संतती शिक्षण घेऊन कशी चांगली होईल याकडे पालकांनी लक्ष द्यावे – प्रा.रविद्र कोकरे

(जावली /अजिंक्य आढाव) संपत्तीच्या मागे न लागता संतती शिक्षण घेऊन कशी चांगली होईल याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.असे मत प्रसिद्ध कथाकार व प्रबोधनकार प्रा.रविद्र कोकरे यांनी व्यक्त केले नातेपुते एज्यूकेशन सोसायटी संचलित बालक मंदिर व प्राथमिक विभागाच्या स्वामी विवेकानंद शालेय क्रिडा स्पर्धेच्या पारीतोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.डी.एन.काळे होते.यावेळी बालक मंदिर व प्राथमिक विभागाच्या मंथन,शालेय क्रिडा स्पर्धेतील विजेताना प्रमूख पाहूण्याच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आली पूढे बोलताना प्रा.रविद्र कोकरे म्हणाले की, वाढदिवस साजरा करताना केक न कापता फळे कापून,झाडे लावून वाढदिवस साजरे करा.जोपर्यत मंदिराच्या रांगा कमी होत नाहीत आणि वाचनालयाच्या रांगा वाढणार नाहीत. तोपर्यत भारत महासत्ता होणार नाही. असे सांगून ते म्हणाले की,माता,माती,संस्कृतीवर प्रेम करा आई वडीलांची सेवा करा,मानवी आत्मामध्ये ईश्वराचा अंश असतो , त्यास आई म्हणतात.

व्यसनाधिनता,मोबाईल,टी. व्ही पासून दूर राहून आनंदाने जगा. आभ्यासाची कास धरुन ध्येय उंच ठेवा विनोदाकडून ज्ञानाकडे वळवत कोकरे सरांनी आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी मुलांनासह पालकांना खेळवून ठेवून अनेकविनोदी किस्से सांगून सर्वाना हास्यविनोदात बुडवून,प्रबोधन केले प्रारंभी व्यासपिठावरील सरस्वतीच्या फोटोचे पूजन करून दिपप्रज्वलन प्रमुख पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले.बक्षिसपात्र विद्यार्थाचे वाचन अभिजित वाळके यांनी केले.

या कार्यक्रमास प्रसिद्ध कथाकार व प्रबोधनकार प्रा. रविंद्र कोकरे,अॅड डी.एन.काळे.डाॅ.एम.पी.मोरे,नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमुख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सचिव महेश शेटे,संचालक वर्धमान दोशी , नंदन दाते, राहूल पद्मन , सतिश बर्गे , माजी मूख्याध्यापक अंकुश शिंदे , दत्तात्रय काळे,प्रा.राजेंद्र आगवणे , युवराज खलाटे,मुख्याध्यापक विठ्ठल पिसे,कुंडलिक इंगळे,उपप्राचार्य भारत पांढरे,पर्यवेक्षक दत्तात्रय यादव,विनायक देशपांडे.आदि मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन दादासाहेब देवकाते यांनी केले तर आभार मनोज पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!