(जावली/अजिंक्य आढाव)- दि 28 रोजी पवारवाडीतून पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की ऋषिकेश सुनील शेडगे हा नशेमध्ये गावातील लोकांना वेठीस धरून दुकानावर घरावर दगडफेक करून विनाकारण मारहाण करत आहे व त्याला नियंत्रण करणे कठीण झालेले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट पोलीस हवालदार साबळे पोलीस हवालदार चांगण व पोलीस नाईक अभंग यांना पवारवाडीत अंधार पडल्यावर पाठवले व सदर इसमाला ताब्यात घेतले.
सदर इसमाची नशा उतरवण्यास सकाळ झाली होती. नशा उतरल्यानंतर त्याला त्याने काय केले याची जाणीव नव्हती तरी पोलिसांनी कलम 452 323 504 506 भा.द.वि.सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्या कृत्याची सजा देऊन त्याला सकाळी न्यायालयापुढे उभे केले असता माननीय न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. यापुढे नशेबाज लोकांना कोठडीची हवा देणार आहेत. विनाकारण लोकांना वेठीस धरणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई होईल पोलिसांच्या या कारवाईने आसू पवारवाडी मधे समाधान व्यक्त होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, पवारवाडी गावचे हद्दीत शंकर सकुंडे गॅरेज च्या बाजूला असलेल्या रोडवर
सुरेश नामदेव पवार वय 65 वर्षे व्यवसाय वेल्डिंग वर्कशॉप राहणार एसटी स्टँड समोर पवारवाडी ता फलटण येथील वयस्कर व्यक्तीला दि. 28/ 12 /2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुमारास पवारवाडी येथे शंकर सकुंडे च्या गॅरेजच्या बाजूला असलेल्या रोडवर उभे असताना कोणतेही कारण नसताना ऋषिकेश शेडगे यांने हाताने व पायाने मारण्यास सुरुवात केली व मी स्वतःला वाचवण्यासाठी घरी गेलो असता तो माझ्या घरात जबरदस्ती घुसून मला हाताने मारलले व पत्र्यावर दगड टाकले तसेच शंकर सकुंडे यांच्या दुकानात जबरदस्तीने घुसून त्याना शिव्या देऊन सामान फेकून दिले तसेच संभाजी माणिकराव पवार यांना देखील विनाकारण हाताने तडका मारून रोडच्या बाजूला पडलेला दगड मारण्यासाठी उचलला व शिवीगाळ दमदाटी केली अशी फिर्याद दिली असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.