हि बातमी ईतर भाषेत वाचा
solapur

माढा मतदारसंघातून आमचं ठरलंयचा फाॅर्मीला ; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीने राजकीय चर्चाला उधाण…!

(जावली/ अजिंक्य आढाव) –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा माढा लोकसभा मतदारसंघात दौरा झाल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत रामराजे निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य सहकाऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उदान आले आहे.

दरम्यान, माढ्यात भाजप अंतर्गतच जोरदार संघर्ष पेटला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात पुढील खासदार कोण, यावरून याच पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांतून जोरदार संघर्ष युद्ध पेटले आहे.

‘आमचं ठरलंय.. धैर्यशील मोहिते-पाटील हेच माढ्याचे भावी खासदार,’ अशा आशयाच्या पोस्ट मोहिते-पाटील समर्थकांनी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित करून रान पेटविले आहे. त्यामुळे २००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आणि २०१४ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पेटणार हे नक्की.

माढा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून कायमचे निश्चित राहिला आहे , कालच लोकसभा प्रवासादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माढा लोकसभा मतदारसंघात होते यांच्या दौऱ्याला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या हालचाली सुरू झाले आहेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची पकड माढा मतदारसंघावर आहे , यांनाच राष्ट्रवादीचे मतदार नेते असलेले विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब ,श्री.संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांनी शिवरत्न बंगला अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या मुळे चर्चाला उधाण आले आहे.

यावेळेस माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, सोलापूर भाजपचे नेते मा.धैर्यशिल मोहिते-पाटील,मा.अर्जुनसिंह मोहिते-पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

यांच्यासह भेटल्याने नक्की माढा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले असून ,
निवडणुकीत गमासान होणार हे मात्र नक्की मोहिते पाटील यांच्या घराण्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनीही लोकसभेसाठी शडडु ठोकला असून एक प्रकारे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आवाहनच दिले आहे , श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मोहिते पाटील व नाईक निंबाळकर यांच्या भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींची राजकीय खलबत्ते झाले असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!