(जावली/ अजिंक्य आढाव) सुरवडी ता.फलटण येथील रेल्वे लाईनवर असणाऱ्या रेल्वे स्टॅन्डजवळील ट्रांसफाॅर्मर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडुन त्यातील ४०लिटर ऑइल (१०,०००/रुपये किमतीचे ) जमिनीवर खाली सांडून नुकसान करून त्यातील २००किलो वजनाची २० हजार रुपये किमतीची काॅपर वायर चोरुन नेली आहे. घटना १२डिसेंबर २०२३रोजीचे सायंकाळी ५ वाजता ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे फिर्याद सचिन पवार यांनी दिली आहे .
या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो काॅ. पिसे करत आहेत.