हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जावली ता.फलटण येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने घौगंडी बैठक संपन्न

(जावली/अजिंक्य आढाव) – सध्या लोकसभा निवडणूकीचे वेध लागले असुन माढा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने घौगंडी बैठकांचे आयोजन करण्यात येतं आहे.गेले दोन दिवसांपासून कोळकी ता. फलटण येथून शुभारंभ करत प्रत्येक गाव निहाय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्ष मा. महादेव जानकर यांच्या आदेशानुसार माढा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यां प्रत्येक गावातून घौगंडी बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी नगर येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे महासचिव कुमार सुशील यांनी स्वबळाचा नार दिला आहे. भाजप पक्ष आता जुन्यांचा विचार करत नाही असे आरोप करत येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले , जावलीतील बैठकीच्या वेळी रासप पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रासप जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक रासप तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण सोशल ,मीडिया राज्य समन्वयक विक्रम माने युवक तालुकाध्यक्ष निलेश लांडगे, विकास सोसायटी जावलीचे व्हाईस चेअरमन कैलास शेवते, संचालक मारुती गोफणे ,युवा नेते विकास शिंदे, विलास चवरे, शेवते मळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात अत्यंत काटे की टक्कर आहे. राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर असा थेट सामना सन 2019 मधे पाहिला मिळाला.यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही बाजी मारली होती. याच मतदारसंघातून महादेव जानकर साहेब यांना सन 2009 साली 98 हजार 946,(10.76) मतदान झाले होते.

पण सध्या लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक उलटपालती सुरू आहेत भाजपने कोणत्याही परिस्थितीत मिशन 2024 जिंकायचे तयारीने कामाला सुरुवात केली आहे बारामती सह प्रत्येक मतदारसंघ जिंकणे आणि त्यासाठी हवा तो निर्णय घेणे हे भाजपचे धोरण निश्चित आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे आवाहन परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी नवनवीन प्रयोग करणार का हेही आणि औचित्याचे ठरेल.

अजित पवार यांनी केलेले बंड आणि फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना दिलेली साथ या गोष्टी सुद्धा काही वळण घेता येत का तेही या मतदारसंघांमध्ये पाहावी लागेल. परंतु आज देखील या मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदार नेते मंडळी भाजपच्या सत्तेच्या थंडगार थंडगार सावलीत विसावलेली दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!