गोखळी ( प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील जेष्ठ नागरिक सौ.कमलताई दत्तात्रय यादव ( ७१ ) यांचे अल्पसा आजारपणामुळे निधन झाले. त्यांचे पश्चात पती,एक विवाहित मुलगा,तीन विवाहित मुली,दिर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. युवा उद्योजक राजेंद्र दत्तात्रय यादव यांच्या मातोश्री होत शांत, संयमी, मनमिळाऊ,हसतमुख स्वभाव होता त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे . राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण, बारामती,माण, इंदापूर, माळशिरस, दौंड आदी भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील समाजबांधव सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.