हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गुणवरे गावचे धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) या पुरस्काराने सन्मानित

(जावली/अजिंक्य आढाव)गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड आणि टाइम्स ऑफ इंडिया (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार देऊन गौरव केला जातो, याच पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल धीरज आढाव यांना एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.एन.राजे, पोलीस उपायुक्त सौ.स्मार्तना पाटील, माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) उपाध्यक्ष डॉ.मेहबूब सय्यद यांच्यासह माजी सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

धीरज यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. बारावी डीएड, इंग्लिश व अर्थशास्त्र विषयात पदवी, त्यानंतर मास्टर ऑफ लेबर स्टडीज ही उच्च पदवी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज (मुंबई) येथे प्राप्त केली. सध्या ते खाजगी मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मानव संसाधन विभागात एच.आर.पदावर कार्यरत आहेत.

आपणास मिळालेला पुरस्कार आई, वडील, भाऊ, पत्नी, गुरुजन यांना अर्पित करीत असल्याचे धीरज यांनी सांगितले. धीरज यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!