(जावली/ अजिंक्य आढाव) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य विक्रीकर परिक्षेत फलटण पंचायत समिती माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांची कन्या कु.अमृता ढेकळे हिची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.
नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य विक्रीकर निरीक्षक परिक्षेत कु.अमृता ढेकळे यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण ता.आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ,श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर फलटण दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले, महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव वाडकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पै. बजरंग खटके फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पै. किरण गावडे सरपंच अंकुश लोखंडे प्राध्यापक नवनाथ लोखंडे इत्यादी मान्यवरांनी या यशाबद्दल ढेकळे यांचे अभिनंदन केले आहे