हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

धोम बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी : यंदा पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

तलाव, विहिरींना पाणी कमी पडू लागले..!

(जावली/अजिंक्य आढाव) – कायम दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सुटवा या करता, खंडाळा व फलटण पूर्व भागात धोम बलकवडी कालव्याची निर्मिती केली गेली आहे. मात्र, यंदा पावस कमी प्रमाणात झाल्याने शेती, दुग्ध व्यवसाय, छोटे- मोठ्या उद्योग – धंद्यांना डिसेंबर महिन्यातच पाण्याची गरज भासु लागली आहे. अशातच पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. कॅनॉलचे पाणी आल्याने ओढ्याच्या माध्यमातून पाणी तलावात सोडले जाते, यामुळे पुढील काही महिने पाणी साठा उपलब्ध होईल.

जुन महिन्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक प्रकरची पिके घेतली , जुन महिन्यानंतर पाऊसाने मात्र यावर्षी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था “कभी खुशी कभी गम” अशी झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पाणी पातळी एकदम खालावली गेली. यातच हलका व मध्यम पाऊस झाला. डिसेंबर महिन्यात फलटण पूर्व भागात सासकल, गिरवी , दुधेबावी, जावली आंदरुड या भागातील शेतकऱ्यांनी कांदा,गहू, ज्वारी, ऊस ही पिके घेतली. आता या उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागले आहे.

फलटण पूर्व भागात सासकल ,भाडळी दुधेबावी,वडले, जावली, मिरढे, आदंरूड या पट्ट्यातील शेतकऱ्यांची शेती प्रामुख्याने पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून असते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.धोम बलकवडी प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरात कालव्याद्वारे संपूर्ण कृष्णेचे पाणी पोहचले आहे. या कॅनालच्या पाण्यामुळे ऊस क्षेत्र हळूहळू वाढताना दिसत आहे,या बरोबरच फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या वर्षी पाऊस कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडू लागले आहे,यासाठी पूर्व भागातील शेतकरी वर्गातून धोम – बलकवडी प्रकल्पातुन पाणी सोडण्यासाठी मागणी होत आहे.

कायम दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या भागात मात्र या कॅनालच्या पाण्यामुळेच बागायती शेती होवू लागली आहे. परंतु कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्मिंग (कुक्कुटपालन), शेळीपालन, फळबागा, लघु उद्योग यांना पाण्याची गरज भासु लागली

फलटण पूर्व ग्रामीण भागात सध्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबात दोन ते चार गाई असतात.त्यांचा ओला व सुक्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती ऐरणीवर आला आहे. पोल्ट्री फार्मिंग शेड मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत, डोंगर भागावरील गवत सुकल्याने शेळ्यांसाठी कमी प्रमाणात चारा उपलब्ध आहे, कॅनाॅलचे पाणी सुटत असल्यामुळे मुरमाड आणि माळरानावर फळबागांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते आहे.परिणामी धोम बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!