हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

दुधेबावी गावाचे सचिन सोनवलकर यांना पर्यावरण रक्षक पुरस्कार जाहीर

२४ डिसेंबर रोजी राळेगणसिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार

(जावली/ अजिंक्य आढाव) – राष्ट्रीय पर्यावरण रक्षक सन 2023 चा पुरस्कार यंदा सचिन दशरथ सोनवलकर रा. दुधेबावी ता. फलटण यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पर्यावरण विकास तसेच राष्ट्रीय पोलिस मित्र केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

सध्याचा तरुण वेगवेगळ्या करिअरमध्ये नवनवी क्षितिजे गाठताना निसर्गाशी आपली असलेली नाळ आणखी घट्ट करत जाणं आणि पर्यावरण रक्षणा पेक्षा पर्यावरण संवर्धनावर अधिक भर देणं हे फारच थोड्या जणांना साधते. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध निसर्गोपासक म्हणून फलटण तालुक्यातील ओळख असणारे सचिन सोनवलकर यांनी दुधेबावी गावापासून अतिशय दुर्गम भागातील मोगराळे घट परिसरात भवानी माता मंदिर परिसरात ३७०० वृक्षांचे रोपण करत संवर्धन करत निसर्गाशी नाळ जोडलेली दिसते, उजाड माळरानावर बहरलेली वनराई वृक्ष लागवड पहायला निसर्ग प्रेमींची भेट देण्यासाठी येथे येत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पर्यावरण विकास तसेच राष्ट्रीय पोलिस मित्र संघटना यांनी २४ डिसेंबर रोजी राळेगणसिध्दी जि. अहमदनगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व आर्दश गाव हिरवे बाजार सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!