गोखळी ( प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शांतीदास नगर ( गोखळी) येथे श्रीदत्त जयंती व सद्गुरू शांतीदास महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित वार्षिक यात्रेस निमित्त दि.१९ डिसेंबर पासून प्रारंभ होत असुन यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्रामुख्याने अखंड हरिनाम सप्ताह, भव्य खुली भजन स्पर्धा, देशी गोवंश खिलार वळू प्रदर्शन व जनावरांचा भव्य बाजार, कुस्त्यांचे भव्य मैदान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली.
दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे मंगळवार दिनांक १९ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व गुरुचरित्र पारायण सोहळा सकाळी ७ते१० ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ते६हरीपाठ,७ ते ९ हरी किर्तन , हरिप्रसाद नंतर हरीजागर होणार आहे, गुरुचरित्र पारायण व्यासपीठ चालक भागवत भारती, पारायण नेतृत्व ह.भ.प. अशोक महाराज घाडगे. दररोज दैनंदिन कार्यक्रम झाला पुढीलप्रमाणे किर्तन पुढील प्रमाणे मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी ह.भ.प.विष्षूमहाराज टेंबूकर, बुधवार दि २० डिसेंबर रोजी ह.भ.प.भागवताचार्य हे.भ.प.लक्ष्मणमहाराज देवकर,गुरुवार दि २१ डिसेंबर रोजी ह.भ.प.ज्योतिताई सोनवणे, शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी ह.भ.प.सुरेश महाराज सुळ, शनिवार दि २३ डिसेंबर रोजी ह.भ.प. मंगेश महाराज देशमुख, रविवार दि २४ डिसेंबर रोजी ह.भ.प.भागवताचार्य हे.भ.प.केशवमहाराज उखळीकर, सोमवार दि.२५ डिसेंबर हा.भ.प.भागवताचार्य नाना महाराज सुर्यवंशी, मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ हे.भ.प.गणेश महाराज पी डी आर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद , रात्री ९ वाजता भारुड सम्राट ह.भ.प. प्रशांत कापसे ( बार्शी) यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि २३ रोजी भव्य खुला गट भजन स्पर्धा सकाळी १० ते सायं ५ या वेळेत संपन्न होईल या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी( स्वर्गीय ह.भ.प. सोपानराव गेनबा गावडे यांचे स्मरणार्थ उध्दव सोपानराव गावडे यांचे कडून रुपये ११,१११आणि सद्गुरू श्री.शांतीदास महाराज चषक, व्दितीय क्रमांक डॉ अमोल आटोळे यांचे वतीने रुपये ७,७७७ आणि सद्गुरू श्री शांतीदास महाराज चषक, तृतीय क्रमांक साठी अनिल काशिनाथ फडतरे गुरुजी व दादासो पांडुरंग कदम यांच्या वतीने रुपये ५,५५ ५आणि सद्गुरू श्री शांतीदास महाराज चषक स्पर्धेचे ठिकाण शांतीदास नगर (गोखळी)नाव नोंदणी सदाशिव खटके (मोबाईल नंबर 7020296193) या नंबरवर करावी.तसेच मंगळवार दि.१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत जनावरांचा भव्य बाजार खरेदी, विक्री आणि सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ते सायंकाळी ” देशी गोवंश खिलार वळू प्रदर्शन व जनावरांच्या खरेदी विक्रीचा भव्य बाजार तसेच बुधवार दि २७ डिसेंबर रोजी कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे.