हि बातमी ईतर भाषेत वाचा
राजकीय

राजाळे ग्रामपंचायत सदस्याचा गैरकारभार माहिती अधिकारात उघड ; अपात्र ठरविण्याची मागणी

गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कामकाजात गैरव्यवहार - निखिल निंबाळकर यांचे आरोप

(फलटण/प्रतिनिधी) – सन २०२०/२१ मधे राजाळे ग्रामपंचायत निवडणुकीत श्री जानाई पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यात लढत झाली.या निवडणुकीत ११/२ ने विश्वास भोसले गटाने बाजी मारत सत्ता स्थापन केली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य यांचे कढून होतं असलेला गैरकारभार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. यातच जागेच अतिक्रमण, ग्रामपंचायत कामकाजात गैरव्यवहार प्रकरणे आढळून आल्याने श्री. जानाई देवी ग्रामविकास पॅनेलचे विद्यमान सदस्य अपात्र ठरविण्याची मागणी होत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की श्री जानाई देवी ग्रामविकास पॅनेलचा विद्यमान सदस्य गैरकारभार करत असल्याचे आरोप करण्यात आला आहे. ही बाब माहिती अधिकारात उघडकीस आल्याने ग्रामपंचायती चे विद्यमान सदस्य रामभाऊ भगवान निंबाळकर स्वत:च्या मालकीचा जेसीबी नं MH.11BA 4422 ने केलेल्या कामाच बिले स्वत: च्या नावाने काढत असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्याच बरोबरच माजी अधिकारी याच्या व ग्रामपंचायतीच्या संगनमताने महाराष्ट्र शासनाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या जागेतील गाळा बेकायदेशीर दस्त करून खरेदी केला आहे.

वरील सर्व बाबी निखिल निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते राजाळे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवून मा. जिल्हाधिकारी यांचे कोर्टात सातारा यांना दिनांक १७/१०/ २०२३ रोजी तक्रार करून अर्ज दिला आहे त्याचा केस नंबर ६४/२०२३ नुसार त्यामध्ये या सदस्याला अपात्र करण्यासाठी सर्व पुरावे माहिती अधिकारात मिळवून त्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार मा. जिल्हा अधिकारी यांनी संबंधीताला दिनांक ११/१२/ २०२३ रोजी नोटीस बजावली आहे. या बाबतीत योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे अर्जदाराला सांगितले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ अन्वये दाखल विवादाची अर्जाची प्रत मा.जिल्हाअधिकारी सो. सातारा यांचे समोर दि.२०/१२/२०२३ रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!