गोखळी ( प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावतीकरण गावातील नाव नोंदणी पासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची काळजी मतदार यादी नोंदणी बी. एल. ओ. ने घ्यावी असे मतदार नोंदणी अधिकारी तथा फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
फलटण विधानसभा (अ जा.) मतदार संघातील मतदार यादी अद्ययावतीकरणाचे कामाचा आढावा घेण्यासाठी गोखळी येथे धावती भेट दिली.१ जानेवारी २०२४ पर्यंत ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा युवक/ युवती, तृतीय पंथी, नवविवाहिताच्या नावांचा समावेश,मयत आणि स्थलांतरिताची नांवें वगळणे कामे काळजीपूर्वक करावीत असे सांगितले.यावेळी मतदार यादी बी एल ओ ची प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांनी माहिती घेऊन मतदार यादी अद्ययावतीकरणाचा आढावा घेऊन योग्य त्या सुचना दिल्या.
मतदार यादी नाव नोंदणी काम करणारे प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचे कोरोना साथीच्या काळात चांगले काम केल्याचा उल्लेख केला. प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा गोखळी ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र भागवत यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी उपसरपंच अभिजीत जगताप,अक्षय कोठावळे , गोखळीचे पोलिस पाटील विकास शिंदे, खटकेवस्ती चे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ यांचा “पोलिस पाटील ” दिनाच्या निमित्ताने आठवण करून दोन्ही पोलिस पाटलांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.यावेळी गोखळी आणि परीसरातील मतदार यादी अद्ययावतीकरण करणारे बी.एल.ओ. सौ. कुंभार मॅडम सौ.माने मॅडम सौ.घाडगे मॅडम उपस्थित होते.