(जावली/अजिंक्य आढाव) – बरड ता.फलटण येथील मातोश्री मंगल कार्यालयात लग्न समारंभा वेळी दि. १७ रोजी दुपारी १: ४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८२ हजाराचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या बाबत कैलास ठणके राहणार मुजंवडी ता. फलटण येथील रहिवासी असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याच तपास पोलीस हवालदार चांगण करत आहेत