हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

दहिवडी पोलिस ठाण्याचे विठ्ठल विरकर यांना बेस्ट पोलिस ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर

(जावली/अजिंक्य आढाव) श्री. अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दि. २२/९/२०२३ रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस स्टेशन नेमणुकीस असलेले पोलिस अंमलदार व पोलिस स्टेशन हद्दीत असलेला गुणांचा विकास व्हावा तसेच समाजात बेस्ट पोलिस व पोलिसिंग व पोझिशन व्हावी , समाजातील सर्व घटकांना‌ चांगल्या प्रकारे सेवा मिळावी तसेच नियोजनात्मक गुणांच्या स्वरूपात वर्गवारी करून दहिवडी पोलिस स्टेशनला दर महिन्याला अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना बेस्ट पोलिस ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्याची संकल्पना सुरू केली आहे.

या संकल्पनेच्या अनुषंगाने दहिवडी पोलिस ठाण्यातील श्री. विठ्ठल दगडु विरकर यांनी सर्वात जास्त भाग ५ व ६ च्या गुन्हायांची निर्गती करणे , सर्वात जास्त वरिष्ठ अर्जाची निर्गती करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणे अशा कामगिरी बद्दल त्यांना सर्वात जास्त ३८०० गुण मिळाले आहेत. म्हणून त्यांची बेस्ट पोलिस ऑफ द मंथ नोव्हेंबर सन २०२३ या पुरस्कारा करिता निवड करण्यात आली आहे , या पूर्व ते फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या दहिवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असुन अतिशय पारदर्शक कारभारासाठी ते ओळखले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!